News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार करणारे खुद्द आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. Chandrapur District Central Bank scam
बँकेच्या शिपाई व लिपिक पद भरती दरम्यान निवडक उमेदवारांना मुलाखतीत गुण वाढविण्यात आले होते, यावर निवड समितीमधील काहींनी आर्थिक व्यवहार केली असल्याची माहिती प्राप्त झाली होती. Financial scam in recruitment process
वर्ष 2013 मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 24 शिपाई व लिपिक पदाच्या जागेची जाहिरात निघाली होती, सदर भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी भाग घेतला होता.
मात्र पदभर्तीसाठी उमेदवारांची मुलाखती दरम्यान गुण वाढवून दिल्याचा आरोप त्यावेळी झाला होता.
सदर प्रकरणी माजी अध्यक्ष शेखर धोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय खेडीकर, संचालक रविंद्र शिंदे, नंदा अल्लूरवार, पांडुरंग जाधव, ललित मोटघरे, प्रभाताई वासाडे, लक्ष्मी पाटील, अशोक वाहने, निवड समितीमधील 3 अधिकारी, MKCL चे प्रतिनिधी अभंग यांच्यावर सदर आरोप करण्यात आला होता.
Chandrapur Cooperative Bank Recruitment
राजकीय दबावामुळे सदर प्रकरणाची चौकशी प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू होती, माजी आमदार वामनराव चटप यांनी सदर प्रकरणाची CID INVESIGATION व्हावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. Prosecutors became accused in Chandrapur
राज्यात सत्तांतर झाल्याने या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली असल्याने सहकार विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परवानगी देताच त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात 11 आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले.
11 आरोपीविरोधात भादंवि ४२०, १०९, १३ (१), (५) अन्वये गुन्हा दाखल झाला. या नोकर भरतीच्या गैरव्यवहाराचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला होता. गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा सत्र न्यायालयात या अकरा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. Co-operative sector of Chandrapur was shaken
तत्पूर्वी शेखर धोटे, रवींद्र शिंदे, नंदाताई अल्लूवार यांच्या नावाने अटक वारंट निघाला होता. त्यांना जामीन मिळाला. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेचे संकट टळले. मात्र आता दोषारोपपत्र दाखल झाल्याने कायदेशीर लढाईला अखेर त्यांना सामोरे जावे लागणार आहे. cdcc bank chandrapur