News34 chandrapur गुरू गुरनुले
मूलः- जीवंत विदयुत तारेच्या स्पर्शाने पटटेदार वाघाचा मृत्यू झाला. ही घटना पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या तालुक्यातील नांदगाव येथे सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
याप्रकरणी भाडेतत्वावर शेती कसणा-या एका बावीस वर्षीय युवा शेतक-याला ताब्यात घेण्यात आले आहे. Tiger dies due to electric shock
या घटनेने वनविभागात आणि गावक-यांमध्ये खळबळ माजली आहे. नांदगाव येथे सर्व्हे नंबर 316 मध्ये अरूण म्हलारी मसारकर यांची चार एकर शेती आहे. ही शेती येथिलच अंकूश पुनाजी नायगमकर हा भाडेतत्वावर कसत होता. सोयाबीनचे पीक घेतल्यानंतर रब्बीचे पीक म्हणून चार एकरामध्ये चणा पेरलेला होता. रानडुकरामुळे पीकाचे नुकसान होवू नये म्हणून सभोवताल काटेरी तारेचे कम्पाउंड उभारले आहे. या काटेरी तारांमधून रात्रोच्या वेळेस वन्यप्राणी आत जावू नये म्हणून त्याला जीवंत विदयुत तारेचा आकडा टाकल्या जात होता. पीकाची कोणतीही हाणी होवू नये, यासाठी शेतक-याचा उददेश होता. शेतातील तारांना करंट लावलेला असताना शेतशिवारात आलेल्या वाघाला याचा धक्का बसला. त्यातच वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. Chandrapur tiger
सोमवारी दुर्गंधी सुटल्यानंतर गावक-यांनी त्या दिशेने धाव घेतल्यानंतर त्यांना वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाची बातमी वा-यासारखी गावात पसरली.वनविभागास सुदधा याची माहिती देण्यात आली. स्वतः जमीन कसणा-या युवकाने सुध्दा ही कबूली दिली असल्याची माहिती आहे. ही घटना दोन तीन दिवसा आधीच घडली असावी असा अंदाज आहे. घटनास्थळी वनविभाग,पोलिस प्रशासन, विदयत विभाग, इको प्रो आणि पशुवैघकीय विभागाने धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर मृत वाघास चंद्रपूर येथे आणण्यात आले. घटनास्थळी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी भेट दिली. मृत वाघाला पाहण्यासाठी गावक-यांनी एकच गर्दी केली होती.