News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - भाजप व महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची असलेली शिक्षक मतदार संघाची ही निवडणुक चंद्रपूर काँग्रेसच्या इतिहासात भर घालणारी असून चंद्रपूरचे भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी सत्तापक्षाने अस्तित्वाची केली होती. असे असताना मात्र, महाविकास आघाडी पुरस्कृत विमाशी संघटनेचे शिलेदार सुधाकर अडबाले यांनी सत्ता पक्षाला बाजूला सारत महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने विजयश्री खेचून आणली.
Sudhakar adbale हा विजय म्हणजे महाविकास आघाडीच्या एकजुटीची आणि विमासी शिक्षक संघटनेची ताकत आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. Old pension
Sudhakar adbale हा विजय म्हणजे महाविकास आघाडीच्या एकजुटीची आणि विमासी शिक्षक संघटनेची ताकत आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. Old pension
सुधाकर अडबाले यांच्या निर्विवाद विजयाबद्दल महाविकास आघाडीतर्फे चंद्रपूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष भाऊ धोटे, ज्येष्ठ नेते तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड.बाबासाहेब वासाडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोष सिंह रावत, यांचेसह महाविकास आघाडी पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, तालुका स्तरीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार सर्व शिक्षक व त्यांचे पदाधिकारी इत्यादींनी अभिनंदन केले व मुल नगरात गांधी चौकात महात्मा गांधी पुतळ्याला माल्यार्पण करुन विजयोत्सव साजरा केला. Mahavikas aghadi
"एकच मिशन जुनी पेन्शन" असे नारे देत विमाशी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व तालुका स्तरीय काँग्रेस,राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीत सहभागी असणारे घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात मुल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा प्रमुख सुमित समर्थ, तालुका अध्यक्ष प्रा.किसन वासाडे, निमचंद शेतकी, हेमंत सूपणार, काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील शेरकी,ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, काँग्रेस नेते राजेंद्र कन्नमवार, डॉ.पद्माकर लेंनगुरे, किशोर घडसे, प्राचार्य अशोक झाडे, मुख्याध्यापक राजू सावरकर, प्रशांत उराडे, गंगाधर कुंघाडकर, मानापुरे, कैलाश चलाख, सुरेश फुलझेले, साखरे सर, लक्ष्मण खोब्रागडे सर,विजय भुरसे सर, रामटेके सर, संतोष गावतुरे सर, यांचेसह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, व संघटनेत सहभागी अनेक शिक्षक वृंद उपस्थित होते. विजयी उत्सव कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक व पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीचे नेते आमदार माजी मंत्री विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते एड.बाबासाहेब वासाडे, संतोषसिंह रावत इत्यादींचे आभार संघटनेचे सक्रिय पदाधिकारी गंगाधर कुनघाडकर यांनी मानले.