News34chandrapur
चंद्रपूर - शहरातील लालपेठ क्रमांक 4 या भागात 23 फेब्रुवारीला खुल्या खाणी मध्ये ब्लास्टिंग करण्यात आली, त्यामुळे परिसरातील झाड एका घरावर कोसळले. Open coal mine
लालपेठ मध्ये खुल्या कोळसा खाणीचा विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी 4 नंबर मधील वस्तीला हटविण्याचे काम सध्या सुरू आहे, मात्र वेकोलीच्या या नीतीचा परिसरातील नागरिकांनी विरोध करीत वेकोलीला वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे.
लालपेठ भागात तब्बल 6 कोळसा खाणं आहे, ज्यामध्ये 5 भूमिगत खाण व एक खुली खाणं यामध्ये 4 भूमिगत खाणी बंद करण्यात आल्या आहे. Wcl chandrapur
आता वेकोली खुल्या खाणीचा विस्तार करणार असल्याने अनेक घरांना त्यांनी नोटीस बजावली आहे.
गुरुवारी लालपेठ येथील बंडू चांदेकर हे आपल्या कुटुंबासहित घरी होते, त्यावेळी त्यांचे नातवंड एका खोलीत विश्राम करीत असताना अचानक आधी ब्लास्टिंग व त्यांनतर मोठे झाड घरावर कोसळले, त्यामुळे घराचे चांगलेच नुकसान झाले.
वेकोलीने घराला झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा अशी मागणी चांदेकर कुटुंबाने केली आहे.