News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला तहसीलमध्ये १ हजार १९८ विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये 566 मुले आणि 632 मुलींचा समावेश आहे. परीक्षा सुरळीत व शिस्तबद्धपणे पार पाडण्यासाठी आणि परीक्षेतील अनुचित प्रकार रोखण्यासाठी स्थानिक महसूल विभागाचे पथक तहसीलमध्ये कार्यरत आहे. Hsc exam 2023
सिंदेवाही तालुक्यात एकूण तीन परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. त्यात 1) सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही,
2) सीताबाई शेंडे कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही,
3) ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव यांचा समावेश आहे.या तीनही परीक्षा केंद्रावर तहसीलदार जगदाळे, ठाणेदार चव्हाण,
नायब तहसीलदार धात्रक, बिडिओ सुक्रे, मंडळ अधिकारी चीडे यांनी पाहणी केली असता सिंदेवाही तील बारावी च्या बोर्ड परीक्षा केंद्रावर परीक्षा शांततेत , सुव्यवस्थित पणे सुरू असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांना दिसून आले. Exam centre
या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यामुळे विध्यार्थी तसेच
विद्यार्थी पालकात व शिक्षण प्रेमी मंडळी करून समाधान व्यक्त केला जात आहे.