News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृहाचे अधीक्षक श्री.वैभव आगे, प्रमुख उपस्थितीमध्ये वरीष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, तुरुंगाधिकारी ज्योती आठवले, विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, सुभेदार देवाजी फलके इत्यादी मान्यवर हजर होते. Shiv jayanti 2023
कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले, यावेळी कारागृहातील एक न्यायाधीन बंदी यांनी शिवगर्जना करित छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला त्यानंतर सर्व मान्यवरांसह बंदीजनांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट माझा हे गीत गायले. तदनंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. Chandrapur District Jail
यावेळी कारागृहातील एका बंद्याने अफझल खान वधाचे दृश्य निर्माण करणारा छत्रपतींचा पोवाडा सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
तदनंतर कारागृहाचे वरीष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे यांनी बंदीजनांना शिवजयंतीच्या शुभेच्या देत मार्गदर्शन केले, तदनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक कारागृह अधीक्षक वैभव आगे हे बंदीजनांना मार्गदर्शन करीत म्हणाले की, जिजामातेकडून मिळालेल्या शिकवण आणि प्रेरणेतून शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केले, महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी प्रचंडगड किल्ला ताब्यात घेतला व त्यांचे तोरणगड असे करुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली, शिवराय हे लोकांच्या मनावर राज्य करणारे राजे असल्याने ते जाणते राजे होते असे म्हणत त्यांनी बंदीजनांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, कारागृह सुभेदार देवाजी फलके, महेंद्र हिरोळे, कारागृह कर्मचारी, दिपक टोणपे, रिंकू गौर, श्रीकांत मुंगले , इत्यांदी कर्मचारी यांनी विशेश परिश्रम घेतले.