News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - मुल पोलीसानी मोटार सायकल चे कर्कश आवाज करणा-या मोटार सायकलच्या चालकांवर कारवाई केल्याने आता असे वाहन चालविणाऱ्या युवकांवर आळा घालण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.
पोलीस स्टेशन मुल अंतर्गत कर्कश आवाजात वाहन चालविणा-या चालका विरुद आज रोजी मुल पोलीसानी मोहीम करून गांधी चौक मुल येथे नाकाबंदी करून कर्कश आवाजात वाहन चालविणा-या विरुद्ध कारवाई करण्यांत आली. त्यात गांधी चौक ते सोमनाथ रोडने जाणारे मोटार सायकल क्र. एम. एच. ३४ ए.डि. ७८६७ बुलेट या मोटार सायकल चालक नाम राम करकाडे रा.गुल यानी आपले bullet बुलेट मोटार सायकल मध्ये सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडल्यासारखे कर्कश आवाज करून मोटार सायकल चालवत मिळुन आल्याने सदर चालका विरुध्द कारवाई करण्यात आली. मुल पोलीस तर्फे सर्व मुल वासीयाना आवाहन करण्यात येते की, आपण आपले अल्पवयीन मुलाना मोटार सायकल चालविण्यास देण्यात येवु नये जर एखादी अल्पवयीन मुलगा मोटार सायकल चालवितांना मिळुन आल्यास त्याचे विरुद्ध व त्याचे पाल्या विरुद्ध मोटार वाहन कायदयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच कोणीही मो.सा. पालकांनी आपले वाहनात सायलेन्सर मध्ये बदल करून वाहन कर्कश आवाज करून लोकांना ध्वनिप्रदुषन होईल असे आपले वाहन चालवु नये. तसेच आपले वाहनातील नंबर प्लेट हि मोटार परिवहन विभाग यानी दिलेल्या निर्देशानुसारच नंबर प्लेटचा वापर करावा. शहरात हाय स्पीडने गाडी चालविनाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी नागरिकांची मागणी
मुल नगरात चंद्रपूर रोड रेल्वे फटकपासून तर नागपूर गडचिरोली रोड चामोर्शी नाक्या पर्यन्त दुभाजक हायवे मार्ग मुल शहराच्या मध्यभागातून करण्यात आला असून नेमक्या याच मार्गावरून तरुण मुले मोठ्या हाय स्पीडने (भरधाव वेगाने) दुचाकी सुसाट वेगाने चालवतात.याच मार्गावर तहसील व पंचायत समिती,न्यायालय, बँक ,भूमिअभिलेख कार्यालय त्याला लागूनच झेरॉक्स, आणलाईन कंप्युटर सेंटर असल्याने रोजच शेकडो नागरिकांची गर्दी असते. तसेच बस स्थानक समोर देखील अशीच अवस्था रोजच राहते. अशातच भरधाव वेगाने दुचाकी आणि चारचाकी सुद्धा सुसाट पने चालवतात त्यामुळे पंचायत समिती व तहसील आफिस समोर अनेक अपघात होत आहेत. यावर निर्बंध घालने अत्यावश्यक आहे. करीता शहराच्या मध्यभागातून हाय स्पीडने भरधाव वेगाने कोणतीही दुचाकी चारचाकी गाडी चालवली तर भविष्यात फार मोठा अपघात होऊ शकते करीता यावर पायबंद यावा म्हणून त्यांना तात्काळ पोलिसांनी त्याब्यात घेऊन कारवाई करावी. अशी मागणी मुलच्या नागरिकांनी केली आहे.