News34 chandrapur
चंद्रपुर :- चंद्रपूर बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस असो.च्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा चंद्रपुर श्री - २०२३ चे दि 18/02/2023 शनिवारी सांय 6:00 वाजता गांधी चौक मनपा पटांगणावर चंद्रपुर येथे भारतीय शरीरसौष्ठव महासंघ व बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस विदर्भ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली.
Bodybuilding competition
या स्पर्धेचे उद्घाटन किशोरभाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते तर सह उद्घाटक ब्रिजभुषण पाझारे माजी सभापती, स.क., जि. प. चंद्रपूर भा.ज.पा. महामंत्री चंद्रपूर महानगर म्हणून होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे जिल्हा शहर अध्यक्ष भाजपा चंद्रपुर महानगर, राहुल पावडे, माजी उपमहापौर, मनपा, चंद्रपूर, विशाल निंबाळकर, CBBFA अध्यक्ष, भा.ज.यु.मो. चंद्रपूर, माजी नगरसेवक, संजय कंचर्लावार माजी नगरसेवक मनपा, कुणाल चहारे, सचिव, महा. प्रदेश यु. कॉ., रणजीत डवरे, माजी उपसभापती, कृ.उ.बा.स., चंद्रपूर, अॅड. राहुल घोटेकर, माजी नगरसेवक, मनपा, चंद्रपूर, राजेश सोलापन, जिल्हाध्यक्ष, म. रा.ग्रामीण पत्रकार संघ हे उपस्थित होते.
Mr. Chandrapur 2023
सदर स्पर्धे करिता विदर्भाचे नामवंत पंच महासचिव व पदाधिकारी आले होते या स्पर्धेचे मुख्य आकर्षण उत्कृष्ट बॉडीबिल्डर Mister asia हे होते. Fitness news
स्पर्धेचे निर्णायक म्हणून राष्ट्रीय पंच अभिषेक कारींगवार, विशाल शिंदे, किशोर अदमाणे, महाराष्ट्र श्री अविनाश वाघुले आणि मिस्टर युनिव्हर्स किशन तिवारी हे उपस्थित होते.
या शरीरसौष्ठव स्पर्धेचे मुख्य विजेते मिस्टर चंद्रपुर कमलेश कश्यप, (बेस्ट पोजर) राज अटकापूरवार, (बेस्ट मस्कुलर) आशिष बिरीया, (बेस्ट इम्प्रेव्हमेंट) विक्की पेंदाम, बेस्ट फिजिक्स राज अटकापूरवार, बेस्ट मास्टर सुनील नन्हेट हे ठरले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रपुर बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष विशाल निबाळकर ,उपाध्यक्ष राजेश सोलापन ,कार्याध्यक्ष खेमराज हिवसे ,सचिव सुभाष लांजेकर,सहसचिव प्रशील पोगुलवार ,कोषाध्यक्ष विवेक बुरडकर, सल्लागार रणजित डवरे, पदाधिकारी गणेश रामगुंडेवार, मुकेश पांडे, कल्पेश रणदिवे ,सावन कालीवाले, अक्षय अंबीरवार,करण कालीवाले, करण पडवेकर, प्रमोद जिवतोडे आदींनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेचे समालोचन मोंटू सिंग यांनी केले.