News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - कोरोना कालावधीनंतर महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटामाटात साजरा होत असून मार्कांडा येथे भव्य यात्रा भरली असल्याने मुल बसस्थानकावर मुल सिंदेवाही पोभूर्णा सावली तालुक्यातील हजारो भाविकांची गर्दी उसळली असून यात्रेकरुसाठी ४० बसेस लावण्यात आले आहे.
याच दिनाचे औचित्य साधून मुल बसस्थानकावर असलेल्या हनुमान मंदिरासमोर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा काँग्रेस नेते सी.डी सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात कार्य करणारे मुल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेस नेते राकेश रत्नावार यांनी मुल बसस्थानकावर जाणाऱ्या येणाऱ्या शिव भक्त भाविकांसाठी तसेच बसणे प्रवास करणाऱ्या इतरही प्रवाशी बांधवांसाठी महाप्रसाद वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला असून महाप्रसादाचे वाटप स्वतः राकेश रत्नावार, सौ. सोनाली रत्नावार, सोबत त्यांच्या दोन्ही कन्या अशा परिवारासह महाप्रसाद वाटप करीत असून त्यांचे सोबत त्यांचे सहकारी मित्र विवेक मुत्यलवार, संदीप मोहबे,रणजित आकुलवार, अभिजीत चेपूरवार,बबलू सय्यद, अभय चेपुरवार, गौरव पुप्रेडिवार, येंनगंटीवार, यांचेसह युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यांनीही सहकार्य केले. महाशिवरात्री व शिव जयंती अशवअतिशय महत्वाच्या दिवशी आलेल्या समस्त शिव भाविकांना महाप्रसादाचे वाटप केल्याने आयोजकांप्रती भक्तजनानी आभार व्यक्त केले आहे.