News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात काम करीत असताना कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला.
रविवारी 19 फेब्रुवारीला ही घटना घडली.
दुरुस्ती व देखभाल अवस्थेत असलेल्या 500 मेगावॉट च्या क्रमांक 5 वर काम करीत असताना कंत्राटी कामगार सचिन गोवर्धन हा तब्बल 22 मीटर उंचीवरून खाली कोसळला.
त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सचिन गोवर्धन हा कंत्राटी कामगार होता, रविवारी देखभाल व दुरुस्तीसाठी संच क्रमांक 5 हा बंद होत, त्यावेळी सचिन या बंद संचाची सफाई करण्यासाठी कोल मिल मध्ये गेला होता.
मात्र काम करीत असताना सचिन चा अचानक तोल गेला असता तो तब्बल 22 मीटर उंचीवरून खाली कोसळला. Cstps chandrapur
सचिन च्या मृत्यूनंतर कामगारांनी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली आहे, कंत्राटदाराने त्याला सुरक्षा साहित्य दिले असते तर त्याचा मृत्यू झाला नसता अशी चर्चा कामगारांमध्ये होती.