News34 chandrapur
चंद्रपूर - नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देत शिवसेना व धनुष्यबाण यावर एकनाथ शिंदे यांचाच असल्याचे अधिकार असल्याचे निकालात स्पष्ट केले. Shivsena crisis
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ असे पत्रकार परिषदेत सांगितले.
मात्र या निर्णयामुळे राज्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी भाजप व शिंदे सरकार वर नाराज झाले आहे. Central election commission decision
भाजप शिंदे चा उपयोग करीत राज्यात हुकूमशाही पध्द्तीने वागत असल्याचा आरोप आता व्हायला लागला आहे. Uddhav thackeray vs eknath shinde
शिंदे व भाजप सरकार विरोधात 19 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात खोके सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली, निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजपच्या खेळीचा संदीप गिर्हे यांनी निषेध करीत, येणाऱ्या निवडणुकात भाजप व खोके सरकार ला त्याची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी दिली. Politics news
निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, महिला संघटिका उज्वला नलगे, सिनेट सदस्य विभागीय सचिव युवासेना निलेश बेलखेडे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर, शहरप्रमुख सुरेश पचारे, महिला शहर प्रमुख वर्षा कोठेकर, युवासेना युवती संघटिका रोहिणी पाटील व असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Chandrapur shivsena