News34 chandrapur
चंद्रपूर - केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसांचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. अदानी समूहातील गैरकारभारामुळे एलआयसीचे LIC ३३ हजार कोटी, भारतीय स्टेट बँक आणि इतर बँकेचे तब्बल ८० हजार कोटी रुपये परत मिळेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
Adani Group of Industries
Adani Group of Industries
त्यामुळे अदानी उद्योग समूहातील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, गुंतवणूकदारांच्या पैशाला संरक्षण देण्यासाठी सरकारने संसदेत चर्चा घडवून आणावी, या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार प्रदेश कार्यालय कमिटीच्या सूचनेनुसार चंद्रपुरात एसबीआय बँकेसमोर आंदोलन आयोजित केले आहे. Sbi bank chandrapur
या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी केली आहे.