News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्हा पोलीस दलात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होताच चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलीस निरीक्षक बदलीमुळे नाराज झाले, त्यांनी केबिनमध्ये केलेल्या अवाजवी खर्चातून लावलेले सामान काढून नेले.
मात्र आता स्थानिक गुन्हे शाखेचे नवे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या कारकिर्दीत पहिली कारवाईचं वादग्रस्त ठरली आहे. Local crime branch chandrapur
सट्टापट्टीच्या कारवाईत एलसीबी पथकाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप पवन भगत यांनी लावल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Sp chandrapur
3 दिवसांपूर्वी बल्लारपूर येथे 2 सट्टापट्टी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली होती, त्यामध्ये महेश टोकलवार व पवन भगत यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेला मुद्देमाल पहिल्या कारवाईत 17 हजार तर दुसऱ्या कारवाईत 25 हजार रुपये दाखविले.
मात्र स्थानिक गुन्हे शाखेची ती कारवाई संशयाच्या भोवऱ्यात आली आहे, ती जप्त केलेली रक्कम व आरोपी यांच्या घरून नेलेली रक्कम यामध्ये फार तफावत आहे, पथकातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिला बचत गटाचे 1 लाख 10 हजार व पवन भगत यांच्या घरून 95 हजार रुपयांची रक्कम नेली असल्याचा दावा भगत यांनी केला आहे.
Police corruption
विशेष म्हणजे या कारवाईची प्रेस नोट सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेने जारी केली नाही.
आणि कारवाईत 17 हजार रुपये दाखविले, पथकावर कारवाई व्हावी यासाठी उलगुलान संघटनेचे राजू झोडे, भीम आर्मीचे जितेंद्र डोहणे व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची भेट घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला निलंबित करण्याची मागणी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांने शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारत त्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
राजू झोडे व पवन भगत यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या करवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत टोकलवार यांच्या आईने कपाटात बचत गटाचे 1 लाख 10 हजार रुपये ठेवले होते मात्र पोलिसांनी जबरदस्ती करीत ते पैसे कपाटातुन घेऊन गेले, त्यानंतर पवन भगत घरी नसताना त्यांच्या घरून 95 हजार रुपये घेऊन गेले. Chandrapur news
आणि पोलिसांच्या कारवाईत त्यांनी फक्त 17 हजार रुपये दाखविले, याचा अर्थ 2 लाख रुपये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपसात वाटून घेतले.
त्या पथकाला तात्काळ निलंबित करावे कारण अश्या पोलिसांमुळे चंद्रपूर पोलीस दल बदनाम होत आहे.
बदली सत्रातील नाराजीमुळे आता स्थानिक गुन्हे शाखा चांगलीच चर्चेत आली आहे, आणि आता नव्या पोलीस निरीक्षकांची कारकीर्द ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दावणीवर लावली आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता स्थानिक गुन्हे शाखाविरोधात तक्रार केल्याचे मला काही माहिती नसल्याचे सांगत, जर गैरप्रकार झाला असेल किंवा नसेल त्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक चौकशी करीत योग्य निर्णय घेतील.