News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर मूल मार्गावरील मागील 10 ते 12 वर्षांपासून वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात असलेले अवैध अतिक्रमण आज सकाळी वनविभागाच्या वतीने पाडण्यात आले.
आज सकाळी वनविभाग, पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महानगरपालिका, महावितरण विभाग, एसटीएफ व वनमजुर असा एकूण 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा मूल मार्गावर बुलडोजर घेऊन पोहचला. Chandrapur forest department
सदर अतिक्रमण हे चंद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र चंद्रपूर नियतक्षेत्र बाबूपेठ येथील कक्ष क्रमांक 402 व 403 या राखीव वनक्षेत्रात कच्चे व पक्के बांधकाम करण्यात आले होते.
सदर राखीव वनक्षेत्रात पानठेले, सायकल स्टोर्स, चहा टपरी व तब्बल 14 धाबा चालकांनी अवैध पध्दतीने अतिक्रमण केले होते. Forest Encroachment
सकाळी वनविभागासाहित इतर विभागाने संयुक्त मोहीम राबवित सदर अवैध अतिक्रमण पूर्णपणे उध्वस्त केले.
याबाबत धाबा चालकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अतिक्रमण पाडण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचे नोटीस देण्यात आले नाही, सोबतच ज्यावेळी वनविभागाने कारवाई केली त्यावेळी आम्हाला सामान काढण्याचा सुद्धा वेळ दिला नाही. त्यामुळे आमच्या धाब्यावरील सामानाचे नुकसान झाले.
चंद्रपूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांनी माहिती दिली की सदर अवैध अतिक्रमण हे अनेक वर्षांपासून मूल मार्गावर होते, वनविभागाने अनेकदा त्यांना अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही दिल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी अतिक्रमण काढलेच नाही.
Chandrapur news
वनविभागाच्या ही अतिक्रमण हटाव मोहिम मुख्य वनसंरक्षक लोणकर, उपवन संरक्षक मध्यचांदा श्वेता बोडू, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनाधिकारी (दक्षता) पवार, निकिता चौरे सहायक वनसंरक्षक (तेंदू), उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कारेकर वनपरिक्षेत्र अधिकारी, राजेंद्र घोरुडे वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण), राजेश मुळे, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार खांडले यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली.
यावेळी महानगरपालिका, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग विविध विभागाचे 100 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.