News34 chandrapur
चंद्रपूर - वेकोली वणी परिसरातील निलजई खुल्या खाणीतील सीएचपी बंकर क्रमांक 49 मध्ये शनिवारी दुपारी अचानक आग लागली असून यामध्ये लाखो रुपयांचा कोळसा जळून खाक झाल्याची चर्चा सुरू आहे. Big fire in chandrapur
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेकोली वणी परिसरातील निलजई कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळसा उत्पादित केला जातो.शनिवारी या खाणीतील सीएचपी बंकरला आग लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. Wcl chandrapur
या बंकरमधून दररोज हजारो टन कोळशाचे गाळप करून परिसरातील विविध उद्योगांना पुरवठा केला जातो. या आगीत कोळशाबरोबरच लाखो रुपयांचे यंत्रही जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उन्हाळा सुरू होताच कोळशाच्या आगीच्या घटना घडू लागतात. कडाक्याच्या उन्हात अशा घटना वारंवार समोर येतात. वेकोलीच्या माजरी, बल्लारपूर येथील कोळसा खाणीत यापूर्वीही अशाच प्रकारच्या आगीच्या घटना घडल्या आहेत. माजरी भूमिगत, एकोना कोळसा खाण, सास्ती, भटाडी, लालपेठ ओपन कास्टमध्येही अशा आगीच्या घटना घडल्या आहेत. एकोना कोळसा खाणीत 30-40 हजार टन कोळसा जळून राख झाला होता. Fire in coal mines
सध्या कोळसा पेटू शकेल इतकी उष्णता नाही. या आगीच्या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. वेकोली वणी परिसरातील कोळसा खाणीतील कोळशाच्या हेराफेरीच्या घटनाही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.दरम्यान, अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईही झाली. या आगीच्या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सामान्य आग, नियंत्रणात आणले- WCL अधिकारी
या आगीच्या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बंकर क्रमांक 49 वर वेल्डिंगचे काम सुरू होते.त्यामुळे ठिणगी खाली पडल्याने आग भडकली,मात्र हे लक्षात येताच आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आणि ही आग सामान्य असल्याने तात्काळ नियंत्रणात आणण्यात यश आले.ही आग मोठी नव्हती. असे 'ते'अधिकारी म्हणाले.
वरोऱ्यात ऑइल दुकानाला आग ,लाखोंचे नुकसान
वरोरा शहराच्या गजबाजीच्या डॉ. अब्दुल कलाम चौक येथे जवळच असलेल्या महावितरण कार्यालयाच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या दुकानाच्या रांगेतील संदीप गांधी यांचे ऑइल चे दुकान आहे.या दुकानाला आज दुपारी अचानकपणे आग लागल्याने दुकानात असलेले सर्व ऑइल बॉटल, टायर तसेच इतर साहित्य जाळून खाक झाले आहे. दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले परंतु तोपर्यंत सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले होते.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .