News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख व गोंडवाना विद्यापीठाचे विद्यमान सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. Yuvasena
निलेश बेलखेडे यांची युवासेनेच्या विभागीय सचिवपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यातील युवासेना मजबूत करण्यासाठी बेलखेडे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेच्या वतीने पक्षात मोठं पद दिलं आहे.
निलेश बेलखेडे यांनी याआधी शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून काम करीत युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची भूमिका योग्यप्रकारे मांडली असून त्यांनी यंदाच्या सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ निवडणुकीत विजयश्री प्राप्त केला. Shivsena news
आज पक्षाने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देत विश्वास टाकत त्यांना विभागीय सचिवपद दिले असून ह्या पदाला योग्य न्याय देत युवासेना मजबूत करू अशी प्रतिक्रिया बेलखेडे यांनी दिली आहे.