News34 chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर - गडचिरोली हे दोन जुळे जिल्हे आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदीवासी बांधव वास्त्यव्य करीत असतात. परंतु आदिवासी समाजाचे क्रांतिवीर बापूराव शेडमाके यांच्या या भूमीतील युवकांना त्यांचा बलिदानाचा विसर पडता कामा नये याकरिता विद्यापीठ परिसराला क्रांतिवीर बापूराव शेडमाके नाव देण्याची लोकहितकारी मागणी सिनेट सदस्य तथा युवासेनेचे गडचिरोली चे जिल्हा विस्तारक प्रा. निलेश बेलखेडे, प्राचार्य. संजय सिंग सर यांनी केले.
Gondwana university gadchiroli
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्हा देखील मोलाचे योगदान आहे. त्यांच्या हक्काच्या स्वातंत्र्यासाठी चंद्रपूरच्या भूमीपुत्रांनी हसत हसत आपला जीव गमावला आणि इतिहासात अमर झाला. जरी आमच्या इतिहासकारांनी त्यांचे नाव, काम, त्याग कमी लेखले असले तरी ते या वीरांची वीरता नाकारू शकले नाहीत. त्यांच्या जन्मस्थळाचा सन्मान वाचवताना असे किती आदिवासी नायक शहीद झाले हे माहित नाही, परंतु त्यांची नावेही इतिहासात फारच कमी आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर शाहिद क्रांतीसुर्य बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विशेष महत्वाचे आहे, ते क्रांतीचे मशाल होते.
Baburao shedmake history
त्यामुळे या वीराची नवीन पिढीला माहिती असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोणत्याची ठिकाणी त्यांचे मोठे स्मारक नाही. हि आपल्या आदिवासी बहुल भागासाठी खेदाची बाब आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात त्यांचे नाव व पूर्णाकृती पुतळा उभारल्यास नवीन पिढीला त्यांच्या बलिदानाची प्रेरणा मिळत राहणार आहे अशी माहिती यावेळी निलेश बेलखेडे यांनी दिली. हि मागणी तात्काळ पूर्ण करण्याची ग्वाही कुलगुरू यांनी दिली आहे.
