News34 chandrapur
चंद्रपूर - सावित्रीआई फुले जयंतीनिमित्त डोंगरगाव तालुका मुल येथे दिनांक सात जानेवारी 2022 रोजी भव्य दिव्य असा प्रबोधन सोहळा संपन्न झाला. Library
यावेळी सावित्रीआई फुलेंना सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करून खरी श्रद्धांजली देण्यात आली डॉक्टर राकेश गावतुरे यांच्या हस्ते वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उदघाटनपर भाषणामध्ये गाव तिथे वाचनालय उभे करू या संकल्पच्या पुनरुच्चार केला त्यानंतर भव्य असा करियर गायडन्स चा कार्यक्रम आणि प्रबोधन संमेलन सुद्धा घेण्यात आले.
सक्सेस पॉईंटचे संचालक विजय मुसळे सर यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या शेकडो संधी कशा उपलब्ध करून घेता येतील आणि तिथपर्यंत पोहोचण्याच्या परीक्षा आणि मार्ग क्रमण कसे करता येईल याचं आपल्या ओजस्वी शैलीमध्ये हसतखेळत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये फार उत्साह दिसून आला मुसळे सरांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांना त्यांच्या जबाबदारीचे सुद्धा जाणीव करून दिली यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी सिंदेवाही चे नकटुजी सोनुले सर उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ ओबीसी विचारवंत नामदेवराव जयंती सर यांनी समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे आणि समाजाचे संघटन मजबूत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली समाजाचा राजकारणासाठी केवळ वापर केला जाऊ नये अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मंचावर समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोणबले, अखिल भारतीय माळी महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष छायाताई सोनुले माजी नगरसेविका संगीता ताई पेटकुले मुख्याध्यापिका रेवतकर मॅडम कांबडी सर रामटेके सर आणि हजारो च्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विनोद ठाकरे आणि प्रस्तावना श्री सोनुले यांनी पार पडली.