News34 chandrapur
चंद्रपूर - आजकाल देशातील प्रत्येक वृत्तवाहिन्यात हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे, मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात हिंदू-मुस्लिम बांधव कसे मैत्रीपूर्ण राहतात याबाबत मात्र कुणी कधीही वृत्त वाहिन्यात दाखवीत नाही.
असाच एक सामाजिक प्रसंग चंद्रपुरात घडला असून, माणुसकी काय असते? आयुष्य जातीपलीकडे किती सुंदर आहे असा अनुभव आपल्याला येईल.
मूळ वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक रोहित परतेकी हे सध्या चंद्रपुरातील रामनगर येथे कार्यरत आहे. Police officer
त्यांची पत्नी 9 महिन्याची गरोदर, आणि वेळेवर आलेली पोलीस भरती मध्ये बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर दोन्ही कर्तव्य निभावण्याची वेळ आली होती.
10 जानेवारीला रुग्णालयातुन परतेकी यांना फोन आला पत्नीला घेऊन लगेच या, पोलीस भरतीत व्यस्त असलेले परतेकी आपल्या वरिष्ठांची परवानगी घेत रुग्णालयात दाखल झाले.
डॉक्टर म्हणाले की तुमच्या पत्नीच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, प्रसूती दरम्यान समस्या निर्माण होऊ शकते, तात्काळ O+ रक्ताची व्यवस्था करा. Chandrapur news
साधारण 2 महिन्यांपूर्वी परतेकी चंद्रपुरात आले होते, ओळखीही कमी, मित्र कमी कुणाला सांगायचे.
त्यांनी तुषार येलमे नामक मित्राला कॉल केला, लगेच 10 मिनिटात रक्ताची व्यवस्था सुद्धा झाली. परतेकी तात्काळ रक्तपेढी मध्ये पोहचले, रक्तदात्याला शोधून त्यांचे आभार मानायला हवे या हेतूने त्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र पुढे कुणी आले नाही.
त्याचवेळी एक मुस्लिम समाजाची महिला फातिमा पट्टावाला या पुढे आल्या, परतेकी यांनी आपल्या मित्राचे नाव त्यांना सांगितले असता होकार देत, फातिमा यांनी मीच रक्त दिले असल्याचे सांगितले. Social news
परतेकी यांना याआधी विश्वास बसला नाही कारण, महिला व मुली रक्तदानाच्या कार्यात जास्त सहभाग घेत नाही. त्यांनी आपलं नाव सांगत मी हकीम ची बहीण आहे, माझा भाऊ रक्ताचे नाते अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात जोपासत आहे, रक्तपासून कुणी वंचित राहू नये यासाठी चंद्रपुरात रक्तदात्यांची मोठी साखळी हकीम चालवीत आहे अशी फातिमा यांनी माहिती दिली. Blood donation
हकीम भैयाचा मला कॉल आला होता, चंद्रपुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीला रक्ताची गरज आहे मी लगेच होकार दिला व रक्तदान केले.
फातिमा यांच्या रक्तदानाची चर्चा आजही जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात सुरू आहे, हे तेच हकीम आहे ज्यांना आपण भारत हुसेन च्या नावाने ओळखतो.
आज समाजमाध्यमांद्वारे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे, मात्र चंद्रपुर जिल्ह्यात सर्व धर्म समभाव असे चित्र नेहमी बघायला मिळते.
फातिमा यांच्या सामाजिक कृतीने आज प्रत्येक समाजातील महिला-पुरुषांना एक चांगला संदेश मिळाला आहे.