News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दिनांक ०४-०१-२०२३ रोज बुधवारला सकाळी ११.०० वाजता मूल येथे वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या वारंवार त्रासामुळे वनविभाग तथा शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी किसान सेल चे अध्यक्ष तथा ओबीसी नेते जगदीश जूनघरी चंद्रपूरचे माजी नगरसेवक राजेंद्र आखरे ह्यांच्या उपस्थितीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या नेतृत्वात ठीय्या आंदोलन गांधी चौक मूल येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले.
सदर आंदोलनात सुमारे 2000 च्या वर उपस्थिती दर्शवून शेतकरी बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात बहुसंख्येने रोष दर्शवून निषेध करण्यात आला.
सदर आंदोलनात सुमीत समर्थ ह्यांनी राज्य सरकारच्या व वनविभागाच्या निष्काळजी पणामुळे वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व शेतमजूर ह्यांच्यावर उपासमारीची पाळी आणलेली आहे असे प्रतिपादन करून महाराष्ट्र सरकारवर कडाडून टीका केली.
वनविभागाच्या निष्क्रिय व हिटलरशाही पणा मुळे होत असलेल्या वन्यप्राण्यांमुळे समस्त गावकऱ्यांना होत असलेल्या अडचणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रिया ताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधीपक्ष नेते अजित पवार ह्यांच्यापर्यंत नक्की पोहचवून मूल तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना व समस्त जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. NCP Party
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच फक्त जनतेला न्याय मिळवून देऊ शकते असा विश्वास सुमीत समर्थ ह्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दर्शविला.
सोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल चे अध्यक्ष जगदिश जूनघरी, तालुका अध्यक्ष किसन वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे ह्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या विरोधात निदर्शने देऊन गांधी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत पदयात्रा काढून ढोल - ताशा चा भव्य डपरा समूहाच्या आवाजात परतवाघ रुपधारण करून देखावा ह्यांचे रॅली व महाराष्ट्र सरकार च्या विरोधात एक अनोख्या भव्य उपस्थितीत निदर्शने देऊन तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. Ncp news
त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीवर लाफरवाही केल्यास व संबंधीत विभागासोबत बैठक न लावल्यास सदर आंदोलन पुन्हा ह्यापेक्षा भव्य स्वरूपात तीव्र आंदोलन घेण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला.
सदर आंदोलन यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किसन वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका महिला अध्यक्ष नीता गेडाम, शहर महिला अध्यक्ष सौ अर्चना चावरे, युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, युवा नेते बंडू साकलवार, प्रा.प्रभाकर धोटे, नंदू बारस्कर अनिकेत मारकवार, शहर उपाध्यक्ष दुष्यांत महाडोळे तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे, विकास गुरनुले, अजय त्रिपत्तीवार, नंदू बारस्कर प्रभाकर धोटे, हेमंत सुपणार, लाला साळवे, शुभम शेंडे, नवनीत चिंचोलकर, मारोती शेंडे, मंगल मशाखेत्री, साई पेंदोर, रोहिदास वाढई, सतीश गुरनुले, सुरेश शिंदे, संदीप तेलंग, बालाजी लेनगुरे, राहुल तोटावार, संध्या निकुरे, जयश्री झरकर, विपुल ठिकरे, गिरीधर उईके, किशोर खंडाळे, देवा भुरसे, नंदकिशोर गुरनुले, साई पेंदोर, गणेश गायकवाड, सुरेश गावतुरे, विनायक निकोडे, दिनेश कोल्हटवार, दिवाकर चौधरी, लालचंद मेश्राम, आदी बहुसंख्य पदाधिकारी हजारो च्या संख्येने जणआंदोलन स्वेच्छेने रॅलीत सहभागी होते.