News34 chandrapur
चंद्रपूर - 15 जानेवारीला रात्री 9 वाजून 31 मिनिटांनी चंद्रपूर शहरातील लालपेठ व बाबूपेठ परिसर भूकंप सदृश्य धक्क्याने हादरुन गेले होते.
अचानक आलेल्या हा धक्का नागरिकांना कोल माईन मध्ये ब्लास्टिंग चा वाटला होता मात्र जेव्हा वेकोली अधिकाऱ्यांनी ब्लास्टिंग केली नसल्याचे म्हटल्यावर आपल्या परिसरात भूकंप आला की काय म्हणून चांगलेच घाबरले.
प्रशासनाची तारांबळ उडाली, त्यातच भूगोल तज्ञ सुरेश चोपणे यांनी कोळसा खाणीत भूस्खलन झालं असेल अशी शक्यता वर्तविली.
मात्र आज 16 जानेवारीला पुन्हा सायंकाळी 5 वाजून 9 मिनिटांनी तसाच प्रसंग लालपेठ परिसरात घडला. Earthquake in chandrapur?
काही सेकंद लालपेठ परिसरात भूकंप सदृश्य हादरे जाणवले, नागरिक या घटनेमुळे पुन्हा दहशती मध्ये आले आहे. Landslide in chandrapur
कालच्या घटनेची दखल घेत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी नेमकं काय घडलं? याबाबत चौकशीचे निर्देश दिले आहे. Chandrapur coal mines
याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधला असता भूगर्भात काही घडलं असेल अशी शक्यता वर्तविली मात्र जोपर्यंत चौकशीचा अहवाल प्राप्त होणार नाही तोपर्यंत नेमकं काय घडलं हे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चंद्रपूरच्या भूगर्भात नेमकं काय घडलं? हे चौकशीनंतर नागरिकांच्या पुढे येणारच, पण सतत 2 दिवस घडलेल्या या घटनेमुळे नागरिक दहशतीमध्ये आलेले आहे.
याबाबत GSI च्या अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधला असता चंद्रपुरात भूकंपाच्या धक्क्याची एकही नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केले, पण अजूनही GSI च्या अधिकाऱ्यांना चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कसलीही माहिती दिली नसल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले आहे.
देशात कुठेही भूकंप आला तर प्रशासनाच्या या अधिकृत संकेतस्थळा वर आपण माहिती घेऊ शकता.. https://seismo.gov.in/
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे व अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे.