News34 chandrapur
चंद्रपूर - आजच्या आधुनिक युगात काही नागरिक नाना तऱ्हाचे प्रयोग करीत असतात, मात्र काही नागरिक नव्या प्रयोगाने इतिहास सुद्धा घडवितात. History of chandrapur
Wedding card
मात्र चंद्रपुरातील एका युवकाने आपल्या लग्नपत्रिकेवर चंद्रपूर जिल्ह्यातील परकोटाचे दर्शन घडविले आहे. शनिवार 17 डिसेंम्बरला चंद्रपुरातील सुनील मिलाल या युवकाचा विवाह सोहळा तुकुम परिसरातील श्रुती गोट्टमवार यांचेशी होत आहे, त्यांनी आपल्या लग्नपत्रिकेत चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासातील परकोट, स्वच्छ चंद्रपूर, सुंदर व ऐतिहासिक चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वस्तूंवर घाण न करता त्याला जतन कसे करता येईल याकडे सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असा संदेश या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्यासाठी आज प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा, अन्यथा सर्व इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.