News34 chandrapur
चंद्रपूर - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे यांच्या तर्फे जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील ४०० मी. सिंथेटिक धावणपथ, नॅचरल ग्रास फुटबाल मैदान व इतर क्रीडा सुविधांचे लोकार्पण व वॉकिंग ट्रॅक चे भूमिपूजन सोहळा कार्यक्रम दिनांक २४.१२.२०२२ रोजी ४.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हील लाईन चंद्रपूर येथे नियोजित आहे. District sports stadium
मात्र या एका कार्यक्रमाच्या 4 निमंत्रण पत्रिका पुढे आल्याने एकच संभ्रम निर्माण झाला आहे, यामध्ये शासनाच्या 2 तर भाजपच्या 2 निमंत्रण पत्रिका प्रकाशित करण्यात आल्या कारण शासनाच्या पहिल्या पत्रिकेत क्रीडा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं नाव नसल्याने परत पुन्हा दुसरी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या.
भाजपच्या पहिल्या निमंत्रण ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचं नाव नेहमीप्रमाणे प्रकाशित करण्यात आले नव्हते, दुसऱ्या पत्रिकेत ती दुरुस्ती करण्यात आली. Chandrapur news
निमंत्रण पत्रिका पुढे आल्याने नवा वाद सुरू झाला, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना कार्यक्रमाबाबत विचारणा करण्यात आली नसल्याने त्यांनी स्वतःचे नाव पत्रिकेतून वगळण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठविले.
तर दुसरीकडे शासकीय कार्यक्रमानंतर भाजप पक्षाने स्वतः उदघाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे, सदर कार्यक्रम हा शासकीय असून सुद्धा भाजप पक्ष त्याठिकाणी लोकार्पण कार्यक्रम कसा ठेवू शकतो हा यावेळी उपस्थित झालेला प्रश्न आहे.
भाजप पक्षाच्या कार्यक्रमावर चंद्रपूर कांग्रेस अध्यक्ष यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता, कार्यक्रम शासनाचा निधी सुद्धा शासनाचा मग कार्यक्रम भाजपचा कसा?