News34 chandrapur
बल्लारपूर:- तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचा निकाल आज दि.२२ डिसेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये सर्वांचे लक्ष असणाऱ्या बहुचर्चित बामणी ग्रामपंचायतीत भाजप, काँग्रेस आणि युवा शक्ती ग्राम विकास आघाडीचा पराभव करीत सरपंच पदी अपक्ष प्रल्हाद बुधाजी आलाम १०८५ मतांनी विजय मिळविला.
सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीवर युवाशक्ती ग्रामविकास आघाडी चे ७ उमेदवार, भाजप ४, काँग्रेस -१, अपक्ष -१ असे सदस्य विजयी झाले आहे. Election results 2022
सरपंच अश्विनी हर्षल वासमवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मागे टाकत १६७९ मतांनी विजयी संपादन केला. तर १३ सदस्य पैकी १० सदस्य भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना शिंदे गट, १ वंचित आघाडी विजयी झाली आहे. इटोली ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी काँगेस'चे तुळशीदास कवडू पिपरे - ४६९ मते मिळाली. Chandrapur news
काटवली ग्रामपंचायत मध्ये काँगेस पक्षाचे सरपंच राजेश कवढू ढुंमणे २१९ मते घेऊन विजयी झाले. कवडजई भाजपचे सरपंच नितीन सुखदेव येलोरे ५४८ मते घेऊन विजयी झाले.