News34 chandrapur
चंद्रपूर - सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील हवेचा निर्देशांक अत्यन्त धोकादायक परिस्थिती मध्ये गेला असून नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोकादायक वळणावर गेले आहे. Shivsena chandrapur
चंद्रपूर शहरात हवेचा निर्देशांक (AQI) तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे मात्र ती सध्या पूर्णपणे फोल ठरली. Air pollution in chandrapur
येणाऱ्या 15 दिवसात चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत काही उपाययोजना केल्या नाही तर शिवसेना (ठाकरे गट) प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे. Air Quality index in chandrapur
चंद्रपुरात हवेचा निर्देशांक (AQI) साधारणपणे 70 ते 80 पर्यंत असणे गरजेचे आहे मात्र काही दिवसांपूर्वी हे प्रमाण 176 च्या वर गेले होते हे स्वतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सांगितले जे अत्यंत धोकादायक आहे.
या प्रदूषणाचे गंभीर परिणाम चंद्रपुरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे, श्वसनाचे आजार, दमा, कर्करोग सारख्या गंभीर आजाराच्या विळख्यात चंद्रपूरकर सापडला आहे.
शहरातील हवेचा निर्देशांक इतका धोकादायक असेल तर चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प, कोल वॉशरी, वेकोली, जिल्ह्यात असलेल्या विविध सिमेंट कंपन्या या परिसरातील निवासी नागरी वस्तीमधील काय अवस्था असेल याबाबत साधा आकडा ही प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नाही.
सध्या MIDC मध्ये ग्रेस कंपनीचा विस्तार होणार आहे, यावेळी कंपनीच्या जनसुनावणी मध्ये लगतच्या ग्रामपंच्यातील सरपंच सोबत गावकरणी विरोध केला होता मात्र आधी होणार प्रदूषण रोखण्यासाठी काही उपाययोजना न करता पुन्हा नवं प्रदूषण करण्यासाठी या उद्योगाला परवानगी देण्यात आली आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात असलेले मुख्य प्रदूषण केंद्रावर (AQI ) हवेचा निर्देशांक मोजण्याचे यंत्र आधी बसवा, त्यांनतर त्या परिसरातील हवेच्या प्रदूषणाची पातळी किती? हे संबंधित विभागाला कळेल पण तसे न करता प्रदूषण नियंत्रण विभाग बघ्याची भूमिका घेत नागरिकांना प्रदूषणाच्या दलदल मध्ये धक्का देत आहे. Air pollution
येणाऱ्या 15 दिवसात प्रदूषण नियंत्रण विभागाने ठोस उपाययोजना केल्या नाही तर शिवसेना उग्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.यावेळी सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख ,शालिक फाले उपजिल्हा प्रमुख,बबन उरकुडे विधानसभा प्रमुख ,विक्रांत सहारे युवासेना जिल्हा प्रमुख, सुरेश पचारे शहर प्रमुख, प्रशांत गट्टूवार, तालुका प्रमुख, आशिष कावटवार तालूका प्रमुख नगरसेवक, संतोष नरुले आणि शिवसैनिक उपस्थित होते