News34 chandrapur
चंद्रपूर - काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यात कलकाम गुंतवणूकदारांनी ठाकरे यांच्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. Mns adhikrut
आंदोलन शेवटी राज ठाकरे यांनी गुंतवणूकदारांची भेट घेतली, त्या दरम्यान राज ठाकरे यांनी 15 दिवसात तुमचं प्रकरण मार्गी लावतो असे आश्वासन दिले, मात्र त्यांचं आश्वासन पूर्णपणे फोल ठरले. Kalkam fraud
विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 10 हजार गुंतवणूकदाराची कलकाम कंपनीने 100 कोटी च्या वर फसवणूक केली.
यादरम्यान मनसे पक्षातील भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांच्या वर कलकाम कंपनीची साथ दिल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी लावला, त्यांना पक्षातून बाहेर काढा अशी मागणीही गुंतवणूकदारांनी राज ठाकरे यांना केली होती, त्यावेळी राज ठाकरे यांनी गुंतवणूकदारांचे संपूर्ण प्रकरण ऐकून घेत मनसे नेते अविनाश जाधव यांना 15 दिवसात सदर प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. Investors fraud
मात्र त्या गोष्टीला 4 महिने उलटले असून अविनाश जाधव यांचा गुंतवणूकदारांना साधा फोन ही करण्यात आला नाही, 23 डिसेंम्बरला राज ठाकरे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे, आम्ही सर्व गुंतवणूकदार त्यांना जाब विचारायला जाणार आहो, जर का आमची भेट झाली नाही तर आम्ही ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवसस्थानासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा कलकाम च्या गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
कलकाम कंपनीने विदर्भात कार्यालय टाकून अनेक गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविले.
नागरिक आमिषाला बळी पडले आणि लाखो रुपये कलकाम कंपनीत गुंतविले, पैसे परत मिळावे यासाठी गुंतवणूकदारांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
त्यावेळी मनसे पक्षातील भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांनी कलकाम ची बाजू घेत त्यांना साथ दिली. Mns chandrapur
फसवणूक करणाऱ्या कम्पणीला साथ देणारे पदाधिकारी यांना राज ठाकरे यांनी मोठ्या पदावर बढती केली.
एकीकडे आम्हांला न्याय देण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे आपल्या पदाधिकाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न करायचे, आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आता संघर्ष करू अशी प्रतिक्रिया मंगला लोणारे व रत्नमाला चहारे व इतरांनी दिली.