News34 chandrapur
चंद्रपूर - बाबूपेठ येथे नव्याने सुरू झालेली सरकारी देशी दारूचे दुकान तथा बियर शॉपी आणि जुने सुरू असलेले गोकुळ बार या तीनही मद्य विक्रीचे दुकान नागरी वसाहतीमध्ये असल्याने यांना येथून तात्काळ हलवण्यात यावे या मागणीला घेऊन बाबूपेठ मधील शेकडोच्या संख्येत महिलांनी, वार्डातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मागील दहा दिवसांपासून आंदोलनाला बसलेले आहेत. बाबूपेठ परिसर हा अतिसंवेदनशील परिसर म्हणून शहरात ओळखला जातो. Aap chandrapur
यातच या परिसरामध्ये नागरी वसाहतीत मद्य विक्रीचे दुकान असल्याने येथील महिला, विद्यार्थी, युवा करिता डोकेदुखी बनलेले आहे. बाबूपेठ परिसर मध्ये शांती सुव्यवस्था अबाधित ठेवण्या करिता बाबुपेठ परिसरातील संपूर्ण बियर शॉपी, बार, देशी दारूचे दुकान व इतर मद्य विक्रीचे दुकान तात्काळ हद्दपार करण्यात यावे ही भूमिका आम आदमी पार्टीची सुद्धा असून याकरिता आम आदमी पार्टी चंद्रपूर ने आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या सर्व नागरिकांना आंदोलनकर्त्यांना तसेच येथील माजी नगर सेवक स्नेहल रामटेके यांचे सुध्दा या आंदोलनाला पाठिंबा असल्याने त्यांना समर्थन पत्र देऊन ही लढाई आपली एकट्यांची नसून या लढाईमध्ये आम आदमी पार्टी जिल्हा शहर संपूर्ण टीम आपल्या सोबत असून ज्या ज्या वेळेला गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असे आश्वासन आम आदमी पार्टीचे शहर सचिव तथा झोनचे प्रभारी श्री. राजू कुडे यांनी दिले आहे. Liquer shop babu peth
या वेळेला जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, जिल्हा युवा अध्यक्ष मयूरभाऊ राईकवार, शहर सचिव राजूभाऊ कुडे, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, झोन 3 चे अध्यक्ष रहेमान खान पठाण, झोन 1 अध्यक्ष सुनील सतभय्याजी, सहसंयोजक सिकंदर सागोरे, प्रभाग अध्यक्ष इंजि. श्री अनुप तेलतुंबडे, सचिव सागर बोबडे, कृष्णा साहारे, प्रविण चूनारकर, सिद्धार्थ नगर वार्ड अध्यक्ष रूपम तेलतुंबडे, योगेश गोखरे, जयदेव देवगडे, कालिदास ओरके इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.