News 34 chandrapur ( गुरू गुरनुले)
मुल: तालुक्यातील कांतापेठ येथील रेल्वे लाईन परिसरात बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. व मृतदेहाला जवळपास दीड किमी पर्यंत फरफटत नेले. ही घटना बुधवार दुपारी ४ वाजताच्या दरम्यान चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली.
Human Wildlife Conflict
देवराव लहानु सोपणकार वय (५५) रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या गुराख्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे जंगलात शेळ्या चारायला गेले असता वाघाने हल्ला करून ठार केले. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले असा आप्तपरिवार आहे. मागील दोन महिन्यापूर्वी कांतापेठ येथील शेतात काम करायला गेलेल्या महिलेवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली. वारंवार घटना घडत असताना वनविभाग मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता योग्य पावले उचलत नसल्याने नागरिकात रोष व्यक्त केल्या जात आहे. Tiger attack