News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील दि 5 नोव्हेंबर शनिवार ला दुपारी 2 वाजता दरम्यान वासेरा गडबोरी मार्गावरील उमा नदी पुलाजवळ चारचाकी वाहन क्रमांक- एम.एच.34 बिव्ही.-3439 चा चालकाने हयगयीने व निष्काळजीपने आपल्या ताब्यातील गाडी चालवून समोरून येणाऱ्या मोटरसायकल वाहन क्रमांक - एम.एच.34 ए क्यु - 8770 ची समोरा समोर जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील 4 जण गंभीर जखमी झाले. Road accident
यामध्ये 1) विकास पत्रु झोडे वय -23 2) सौ.शोभा झोडे वय - 55, 3)तन्मय झोडे वय - 8 वर्ष राहणार तिघेही नवरगाव ता. सिंदेवाही व 4) बुद्धाजी तुकडू खोब्रागडे वय 75 रा.वासेरा. ता.सिंदेवाही यांना जखमी केले अशी माहिती जवळील सिंदेवाही पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर अपघातातील चार जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हालविण्यात आले. सदर अपघातातील चारचाकी कार चालकावर भा.द.वि. 279, 337, 338 सहकलम 185 मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पि.एस.आय महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार बावणे हे करीत आहेत.
