News34 chandrapur
चंद्रपूर - 7 नोव्हेंम्बरला रात्री 10 वाजताच्या चंद्रपुरात थरकाप उडविणारे हत्याकांड घडले, दुर्गापुरातील मुख्य मार्गावर महेश मेश्राम या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
घटनाक्रम काय?
रात्री 10 वाजताच्या मृतक महेश हा आपल्या मित्रांसोबत बार मधून बाहेर निघाला होता, वाहनात बसत असताना अचानक एका घोळक्याने महेश वर हल्ला चढविला, अचानक झालेल्या या हल्ल्याचा प्रतिकार महेश ने केला मात्र त्या घोळक्यातील एकाने धारदार शस्त्राने महेश वर वर केले, जो पर्यंत महेश चे शीर धडावेगळे झाले नाही तो पर्यंत आरोपी त्याच्यावर वार करीत होते.
महेश चे शीर धडावेगळे केल्यावर आरोपीनी त्या शिराला हातात घेत घटनास्थळी शिराला पायाखाली तुडवीत नेले.
अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली.
घटनेनंतर पोलीस उशिरा दाखल झाली, त्यानंतर नागरिकांच्या रोषाला पोलिसांना सामोरे जावे लागले.
मृतक महेश मेश्राम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता, महेश च्या हत्याप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, इतर संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. Brutally murder
जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी काय म्हणाले?
सदर हत्याकांड हे जुन्या वादावरून झाले असल्याची माहिती रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली, असून काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस सुरू केली आहे. Chandrapur police
वाद काय होता?
महेश मेश्राम या युवकांवर अनेक गुन्हे दाखल होते, काही दिवसांपूर्वी महेश ने एसटी वर्क शॉप चौकातील एका पथ विक्रेत्यासोबत हुज्जत घालत मारहाण केली होती.
वर्षभरापूर्वी एका दारू विक्रेत्यासोबत महेश चा वाद झाला होता, वर्षभरापूर्वी चा वाद व काही दिवसांपूर्वी झालेला वाद महेशच्या हत्येचे कारण बनले असे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात युवकाची क्रूर हत्या याप्रकारे पहिल्यांदाच झाली, या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचे चांगलेच धिंडवडे उडाले.
नुकतेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्यासमोर जिल्ह्यात सुरू असलेली गुन्हेगारी व अवैध धंदे हे आव्हान कायम उभे ठाकले असून त्यापासून कायदा व सुव्यवस्था कसा अबाधित राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
