News34 chandrapur
मुंबई - शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीत ऋतुजा लटके या 53 हजार मतानी विजयी झाले. SHIVSENA UDDHAV THACKERAY
3 नोव्हेंम्बरला अंधेरी पूर्व विधानसभेत मतदारांनी आपला हक्क बजावला, मात्र 31.74 टक्केचं मतदान पार पडल्याने अनेकांच्याया चेहऱ्यावर टेन्शन निर्माण झाले होते, रविवारी मतमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके या आघाडीवर होत्या.
लटके यांच्या नंतर सर्वाधिक मते नोटा ला (NOTA) मिळाली. Rutuja latke win
सुरुवातीपासून नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या या पोटनिवडणुकीची सकाळी मतमोजणी सुरु झाली सर्व फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके मोठ्या फरकानं आघाडीवर होत्या. 66 हजार 247 मतं मिळाली आहेत. त्यांच्यानंतर मिळालेली सर्वाधिक मतं कुणा उमेदवाराला नव्हे, तर नोटाला मिळाली आहेत. सर्व फेरीनंतर नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा साडे बारा हजारच्या घरात पोहोचला आहे. नोटाला 12776 मतं तर अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना 1506 मतं मिळाली आहेत. Andheri bypoll election results
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. By-elections andheri
लटके म्हणाल्या, हा विजय माझे दिवगंत पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी केलेल्या कामांच्या पुण्याईवर मतदारांनी मतदान केले. मतदारांनी त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे मते दिली असल्याचे लटके यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
