News34 chandrapur
मुंबई - महाविकास आघाडीमधील घटकपक्ष शिवसेनेमधील 40 आमदारांनी केलेले बंड आजही 50 खोक्यावरून चर्चेत आहे.
50 खोके एकदम ओक्के...असा जणू नारा विरोधीपक्ष देऊ लागले, मात्र खोक्यावरून सुरू झालेले राजकारण आता गलिच्छ भाषेकडे वळले.
शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना "भिकारचोट" म्हणून संबोधिले.
सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पडसाद उमटले, अनेक जिल्ह्यात सत्तार यांचा पुतळा जाळण्यात आला. Abdul sattar on supriya sule
महिलांविषयी या मानसिकतेचा अनेकांनी विरोध केला, राष्ट्रवादी कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबई व औरंगाबाद येथील निवासस्थानी दगडफेक करीत निषेध व्यक्त केला. NCP
राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांना मंत्री मंडळातून 24 तासाच्या आत सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेसच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.
अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चांगला समाचार घेतला आहे.
बुलढाण्यातील सभेत आदित्य ठाकरे यांनी सरळ केंद्र सरकारला प्रश्न विचारला. Maharashtra Politics
आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”
“महाराष्ट्रातील जनता म्हणून मी तुम्हालाही विचारत आहे की, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?” असे सवालही आदित्य ठाकरेंनी विचारले आहेत.
