News34 chandrapur
चंद्रपूर - संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर रोजी विसापूर येथील जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनि भाग घेतला व शिक्षकानी मुलांना प्रोत्साहित करत कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. Constitution day या निबंध स्पर्धेत विजेते स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच गुरुजनांचे संविधान प्रत व शाल देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपिय भागात संविधान उद्देशिकेचे वाचन व वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन करूणाई बहुउद्देशीय संस्था व अनुसूचित जाती विभाग च्या जिल्हाद्यक्ष निशाताई धोंगडे यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे उपस्थित होत्या.तसेच काँग्रेस चे प्रीतम पाटनकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष महिला पाखीताई उराडे तसेच प्रदेश सचिव हर्षा चांदेकर,सोशल मीडिया प्रमुख नेहा मेश्राम,राजू चौधरी,बांबोडकर सर,शेडमके साहेब,व गावातील मान्यवरांची उपस्थिती होती.