News34 chandrapur
बल्लारपूर - देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन म्हणून ओळख असणाऱ्या बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने 1 महिलेचा मृत्यू तर जवळपास 20 प्रवासी जखमी झाले होते. Over bridge collapsed
घटनेनंतर जनप्रतिनिधी व प्रशासन खळबळून जागे झाले होते, मात्र 7 महिन्यांपूर्वी सदर पादचारी पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिट मध्ये या पुलाला पुढील वर्षे धोका नाही असा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी दिला होता पण त्यावेळी पुलाचे लोखंडी भाग पूर्णतः कमकुवत झाले होते.
त्यावेळी त्या अहवालाकडे कुणीही गंभीरपणे लक्ष दिले नाही, साधी पाहणी सुद्धा कुणी केली नाही.
रेल्वे स्टेशनवर रंगरंगोटी करीत त्याला सुंदर बनविण्याचा प्रयत्न केला पण त्यामधील किती भाग कमकुवत व पोकळ झाला याकडे कुणीही लक्ष दिले नाही. Ballarpur railway junction
घटनेनंतर मात्र जनप्रतिनिधी यांनी चांगलाच गोंधळ घातला, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकमंत्री मुनगंटीवार, खासदार धानोरकर, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती.
रेल्वे विभागाच्या चौकशीत 4 अधिकारी दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. Chandrapur breaking news
यामध्ये इन्स्पेक्टर ऑफ वर्क राजूरकर, विनयकुमार श्रीवास्तव, सहायक विभागीय अभियंता सुबोध कुमार व नरेंद्र नागदेवे या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.
