News34 chandrapur
चंद्रपूर - 7 नोव्हेंम्बरला दुर्गापुरातील महेश मेश्राम क्रूर हत्याकांड मध्ये महत्वाची माहिती पुढे आली आहे.
रात्री 10 वाजता नंतर घडलेल्या या क्रूर हत्याकांडामुळे दुर्गापूर परिसरात चांगलीच दहशत माजली होती. Chandrapur brutal murder
रात्री इमली बार मधून निघाल्यावर 35 वर्षीय महेश मेश्राम यांच्यावर एका घोळक्याने हल्ला केला, या हल्ल्यात महेश चे शीर धडावेगळे करीत, आरोपीनी शिरा सोबत फुटबॉल चा खेळ खेळला. Chandrapur crime news
रात्रीच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते, आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश ही दिले. Chandrapur police
घटनेच्या रात्री मुख्य 2 आरोपी दुर्गापूर पोलिसांनी पकडले, त्यानंतर 8 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
आता पुन्हा दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली, बंडू साव असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी आता एकूण 11 आरोपी पोलिसांच्या अटकेत असून सर्वाना पुन्हा 4 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.