News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दिनांक 25 /11 /2022 महाराष्ट्रातील ताडोबा बफर झोन चंद्रपूर येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे वनविभागाचे मुख्य सचिव वेणू गोपाल रेडडी साहेब व शोभाताई फडणवीस, माजी मंत्री यांची आढावा बैठक संपन्न झाली.
त्यामध्ये शोभाताई यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या, आणि त्यांना येणाऱ्या नेहमीच्या अडचणीला वाचा फोडून शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडल्या वन्यप्राणी वाघ व मनुष्य संघर्ष यामध्ये शेतकरी वाघाच्या दहशतीमुळे आपली शेती करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदार निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी आपले जीवन जगायचे कसे?दुसरे रानडुकरांची संख्या ,शेतीचे होणारे नुकसान. उभ्या पिकाची नासाडी करून रानडुक्कर शेतात येतात व पिकांची नुकसान करतात सध्या स्थितीत तुरीचे पीक पुलावर असून शेतात रानटी डूकराचा कळपच शेतात घुसून तुरीच्या व भाजीपाला पिकाची नासाडी करीत आहेत. अशा वेळेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित सर्वेक्षण करून घेण्याचे आदेश त्या त्या तालुक्यातील वन परिक्षेत्र अधिकारी यांना द्यायला पाहिजे आणि तसा अहवाल त्वरित शासनाकडे पाठऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत द्यायला पाहिजे तरच शेतकरी जगू शकेल.
कारण यापूर्वी मागील दोन वर्षात झालेल्या नुकसान भरपाईची मदत पुढील दोन वर्षात मिळत असते. तेव्हा शेतकरी बांधव खचून जाते. आणि वन विभागाकडून थातूरमातूर नुकसान भरपाई देण्यात येते .ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांची थट्टा करणारी असून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई देण्यात यावी व वनविभागाच्या नुकसान भरपाई चे निकष बदलून शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्यानुसार वनविभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शोभाताई यांनी मुख्य सचिव व पीसीसीएफ नागपूर यांना विनंती करून शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित निकाली काढावे. अशा मागणीचे निवेदन सादर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावे अशी विनंती केली. यावेळी महेंद्र करकडे, मिलिंद हेडाऊ, विपिन भालेराव, संजय मारकवार ,अविनाश वरघंटीवार, दादाजी येरणे, अन्वर शेख, विनोद सिडाम ,संतोष चिताडे प्रामुख्याने उपस्थित होते.
