News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना विविध व्यसनाचे प्रमाण युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले होते, दारूबंदी उठली त्यांनतर सुद्धा गांजा अश्या वस्तू छुप्या मार्गाने येत शहरात विक्री होत आहे. Brown sugar in chandrapur
शहरातील बाबूपेठ भागात काही महिन्यांपासून Brown sugar ची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकासह पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे स्वतः धाड मारण्याकरीता बाबूपेठ येथे पोहचले.
त्याठिकाणी पोलिसांनी तब्बल 38 ग्राम ब्राउन शुगर एकूण किंमत 1 लाख असा मुद्देमाल जप्त केला. Crime news
विशेष म्हणजे रेकॉर्डवरील असलेला गुन्हेगार अजय दुपारे हा आपल्या आई - वडिलांच्या हस्ते ब्राऊन शुगर विकण्याचा धंदा करीत होता, पोलिसानी श्याम दुपारे व रेखा दुपारे यांना अटक केली असून अजय दुपारे हा पसार झाला.
कुणालाही संशय जाऊ नये यासाठी अजय ने आई-वडिलांचा वापर केला, अजय ब्राऊन शुगर बाहेरून आणत विकण्यासाठी देत होता. Chandrapur police
अजय चा ब्राऊन शुगर विकण्याचा सुपर मास्टर प्लॅन चंद्रपूर शहर पोलिसांनी उधळून लावला.
शहरात याप्रकारे अनेक अवैध धंदे सुरू असून त्यावर लवकर आळा घालण्यासाठी शहर पोलीस तत्पर आहे.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता जुनारकर, दिलीप कुसराम व इम्रान खान यांनी केली.