News34 chandrapur
चंद्रपूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहे. chandrapur yuvasena
चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख पदी विक्रांत सहारे (चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा विधानसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Shivsena chandrapur
विक्रांत सहारे हे अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात सक्रिय आहे, मध्यंतरी ते युवासेनेच्या जिल्हा समनव्यक पदी होते, जिल्हाप्रमुख पदावर सहारे यांची नियुक्ती होताच त्यांनी सर्वप्रथम जिल्ह्यातील युवक-युवतीचा समस्येकडे लक्ष देत त्याच तात्काळ निराकरण करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
जिल्हा समनव्यक पदी विनय धोबे, जिल्हा चिटणीस सुमित अग्रवाल, उपजिल्हा अधिकारी हेमराज बावणे, रिझवान पठाण, प्रणित अहिरकर, कुणाल कुडे, तालुका युवा अधिकारी अक्षय कवासे (चंद्रपूर तालुका), तालुका समनव्यक सद्दाम कनोजे, ज्ञानेश्वर लोनगाडगे, शहर युवा अधिकारी शिवा वझलकर, शहबाज शेख, शहर समनव्यक करन वैरागडे, विक्की पाटील, उपशहर युवा अधिकारी प्रफुल चावरे, विधानसभा समनव्यक लोकेश कोटरंगे सह राजुरा व बल्लारपूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त युवासेना पदाधिकाऱ्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहे.
