News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल:- सुरजागड वरून येणारे कच्चे लोहखनिज देशात इतरत्र पाठवण्याकरिता मुल रेल्वे स्थानकाची निवड केलेली आहे. यामुळे मूल तालुक्यातील व शहरातील प्रदूषणाची भीषण समस्या निर्माण होणार व याचे गंभीर परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होणार. त्यामुळे मालधक्का हटाव मुल शहर बचाव या ब्रीदवाक्याला घेऊन गुड मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे मुक शांती आंदोलन महात्मा गांधी जयंतीच्या दिनी करण्यात आले.
मागील सहा महिन्यापासून सुरू होत असलेल्या मालधक्क्याचा प्रचंड विरोध गुड मॉर्निंग वॉक ग्रुप द्वारा करण्यात येत आहे. सर्वप्रथम माल धक्क्याचे होणारे दुष्परिणाम गुड मॉर्निंग वॉक ग्रुपने उजेडात आणले. सदर ग्रुपने विरोध करून येथील स्थानिक लोकप्रतिनिधीला, प्रशासनाला सदर प्रकरण लक्षात आणून दिले. तसेच याचे होणारे दुष्परिणाम मूल शहरासाठी व तालुक्यासाठी अत्यंत घातक आहेत हे लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला पटवून दिले. गांधी जयंतीच्या दिनी शांतीच्या मार्गाने मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी भजन,पथनाट्य करत रघुपति राघव राजाराम या पवित्र धुनीच्या वातावरणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतासाठी "जय जवान जय किसान" चार नारा देणारे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण करून मालधक्का हटवण्यासाठी मुक आंदोलन गुड मॉर्निंग वॉक ग्रुपने केले. शांतीप्रिय आंदोलन करत आजच्या अहिंसा दिनी अनोख्या पद्धतीने मुक आंदोलन करून मुलवासीयांसमोर व समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. या मुक आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक, शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळकरी मुले, सामाजिक व राजकीय संघटना, व्यापारी वर्ग, डॉक्टर, वकील यांनी मोठ्या संख्येने या मुक आंदोलनात सहभाग घेतला.
गुड मॉर्निंग वॉक ग्रुपने सातत्याने मालधक्का हटाव मोहीम राबवत असून याला तालुक्यातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच आजच्या यशस्वी आंदोलनाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
मूल वासीयांचा विजय झाला
आज सांयकाळी मा.ना..सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी मालधक्का बाबत दिलेले आश्वासन प्रमाणे रेल्वेचे अधिकारी यांचे सोबत हरिसींग सभाग्रृह नागपूर येथे मिटींग आयोजीत करविली. त्यात मूलचे सर्व जेष्ठ भाजपा नेते व बचाव समीती व मार्निंग क्लब सदस्य हजर होते, त्यात निर्माणधीन मालधक्का स्थानांतरण समस्या यावर विस्तृत महिती व इतर ठिकाणी हलविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
त्यात प्रामुख्याने मूलचे आरोग्य प्रदुषण व वाहतुक समस्या यांचे निराकरण करणेसाठी सूचविलेले वेगळे उपाय व योग्य पर्यायी सोयीयूक्त जागेची पाहणी करण्याकरिता रेल्वे विभाग एक नविन टेक्नीकल टिम व मूलचे भाजपा पदाधिकारी जिथे रेल्वे स्टेशन गावापासून / लोकवस्ती पासून दुर व हायवा ट्रक वाहतुक साठी सोयीचे राहील असे स्टेशन निवड करेल तो पर्यंत मूल मधील मालधक्का निर्माणधीन कार्य स्थगित राहील असे ठरले. याकरिता मार्निंग ग्रुप हे मागील ४ महिनेपासून सतत प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व लोक प्रतिनिधी व संबधीत विभागाशी पाठपुरावा करित होते याकरिता स्थानीक भाजपा नेत्यामार्फत सारखे प्रयत्न सुरुच होते.
सुधीरभाऊ यांचेशी सतत सपर्क ठेवून तसेच समस्ये संबधी पाठपुरावा करून मूल क्षेत्रातील सर्व BJP दिग्गज नेत्यांनी भाऊंचा दिलेल्या शब्दास पूर्णत्वाकडे नेण्यास महत्वाची भूमिका पार पाडली. आणि मूल वासियां साठी सुटकेचा श्वास टाकण्याकरिता अथक परिश्रम घेतले कारण मूल मध्ये मालधक्का हटाव मोहीम जोर पकडत होती, मोर्चा व आंदोलन सुरु झाल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली होती.
सुधीर भाऊंनी मूल नगराचे प्रति असलेल्या भावना व आपले क्षेत्राचे दायित्व ओळखून योग्य वेळी दखल घेतली व लवकर मार्ग काढला. संपूर्ण मूल मधील नागरीक, सामाजिक संघंटना यांनी मागणी केलेल्या आरोग्याशी व रहदारीशी निगडीत मालधक्का इतर ठिकाणी हलविण्याची जी महत्वाची कार्य "दिला शब्द केला पूर्ण " या प्रमाणे पूर्ण करून मूलवासियांचे विश्वासात अधिक भर घातली याकरिता मूलवासीय सदैव ऋणी राहील.

