News34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात वर्ष 2012 पासून सुगंधित तंबाखू व गुटखा प्रतिबंधित करण्यात आला होता, मात्र त्यानंतर तंबाखू माफिया सक्रिय झाला व राज्यात विविध ठिकाणी प्रतिबंधित असलेला तंबाखू पोहचू लागला. Tobacco smuggle
विदर्भात सर्वात जास्त उलाढाल असलेल्या या अवैध धंद्यात कारवाई मात्र नाममात्र होते, त्यामुळे सुगंधित तंबाखू माफिया सहज कायद्याच्या कचाट्यातून निसटतो. मात्र नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी तंबाखू माफियाला गंभीर इशारा दिला आहे. जर माफियांवर सलग 2 ते 3 वेळा कारवाई झाली असेल तर त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करू असा इशारा आज झालेल्या पत्रकार परिषदेत राठोड यांनी दिला. Chandrapur news
चंद्रपूर जिल्ह्यात वसीम, गुप्ता आणि जयसुख हे माफिया या धंद्यात जास्त प्रचलित आहे. यांच्यावर आधी ही कारवाई झाली मात्र ते कायद्याच्या कचाट्यातून निसटले. मध्यंतरी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने नकली तंबाखू निर्माण करणारे 2 कारखान्यावर धाड मारली होती. त्यानंतरही तस्करी मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. तस्कर कायद्याच्या कचाट्यातून निसटता कामा नये यासाठी त्यांच्यावर मोक्का कायद्यांव्ये कारवाई व्हावी अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत करीत यासाठी नवे धोरण तयार करणार असल्याची माहिती राठोड यांनी दिली आहे. पानठेला व्यावसायिकांवर कारवाई न करता सरळ पुरवठादार यांचेवर कायद्याचा फास आवळणार असल्याची माहिती यावेळी दिली.