News34 chandrapur
चंद्रपूर - स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह दिनांक ७ व ८ ऑक्टोबरला पार पडलेल्या प्रादेशिक स्तरिय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत- चंद्रपूर परिमंडळ द्वारा सादर-' तो परत आलाय ', नाटकाने नाट्य निर्मितीसह, दिग्दर्शनाचे प्रथम, उत्कृष्ट अभिनय 'स्त्री', अभिनय 'पुरुष' या श्रेणीत प्रथम , 'प्रकाशयोजना'-प्रथम व 'रंगभूषा व वेशभूषा '-प्रथम तसेच 'नेपथ्य 'चे द्वितीय क्रमांक पटकावत बाजी मारून दोन्ही दिवस आनंदाचे क्षणांची उधळण करणाऱ्या या नाट्यस्पर्धेत नाट्यरसिकांची व परीक्षकांची मने जिंकत 'प्रथम' क्रमांक पटकावला. चंद्रपूर परिमंडळासाठी ही मानाची बाब ठरली व यासाठी आपले सहभाग नोंदविणाऱ्या विविध समीती सदस्यांचे, कलावंतांचे, मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांच्या हस्ते आज, अधिक्षक अभियंता - श्रीमती. संध्या चिवंडे, श्री. रविंद्र गाडगे, श्री.सुहास मेत्रे, श्री. रामचंद्र वैदकर सह. महाव्यवस्थापक(मा.स.), यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेल्या मध्ये,
निर्मिती प्रथम - ‘तो परत आलाय ’( मुख्यअभियंता श्री. सुनिल देशपांडे,चंद्रपूर ),
दिग्दर्शन: प्रथम – 'तो परत आलाय'( सुहास म्हेत्रे, अधि. अभियंता,चंद्रपूर ),
अभिनय पुरूष: प्रथम - 'तो परत आलाय '( मिथुन मेश्राम,चंद्रपूर );
अभिनय महिला: प्रथम -'तो परत आलाय ' (सायली सायंकाळ, चंद्रपूर);
रंगभूषा व वेशभूषा: प्रथम - 'तो परत आलाय '( ईशा गेडाम,चंद्रपूर),
नेपथ्य: द्वितीय :-'तो परत आलाय '( संध्या चिवंडे ,चंद्रपूर) यांचा तसेच नाट्य कलावंत रविराज राऊत, विवेक माटे, कृपाल लांजे, भालचंद्र घोडमारे यांचा सत्कार करण्यात आला.
या नाटकाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या /उपसमित्या गठीत करण्यात आल्या होत्या व त्यांच्या योग्य नियोजनामुळे, ही नाटयस्पर्धा सुरळीत पार पडली.
स्वागत समिती, उदघाटन व पारितोषीक वितरण समिती, रंगमंच व्यवस्थापन समिती इत्यादी चे - कार्य. अभियंता -सुहास पडोळे, महेशचंद्र तेलंग, श्री. सचिन घडोले, योगेश गोरे, प्रभारी उपमुख्य औदयो. संबंध अधिकारी, श्री. विजय राठोड प्रभारी का.अ., उपकार्यकारी अभियंता - विश्लेष लांजेवार, कृणाल बागुलकर, श्री. श्याम कुर्रा, सहा. महाव्यवस्थापक सुशील विखार तसेच सुशील सहारे, हेमंत गुहे, दिगांबर इंगळे, पंकज नवघरे, रविंद्र वांढरे, तुषार चहारे, पंकज मलीक, बंडुभाऊ कुरेकर, बाबाराव ताजणे, श्रीमती माधूरी सोनवने, श्री. प्रकाश मुसळे, श्री. सुरज कुळमेथे, श्री. विजय भैसारे, श्री. कुणाल आसुटकर, श्री. जगदीश मडावी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.