News34 chandrapur
चंद्रपूर : पदवि व पदव्युत्तर सीईटी परीक्षेद्वारे ज्या अभ्यासक्रमात प्रवेश होतात त्या प्रवेशाच्या वेळी कॉलेज राऊंडच्या प्रवेशित ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना मागील व चालू वर्षापासुन बंद केलेली शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांना देण्यात आले.
सत्र २०२१-२०२२ व २०२२-२०२३ पदवि व पदव्युत्तर सीईटी परीक्षेद्वारे ज्या अभ्यासक्रमात प्रवेश होतात त्या प्रवेशाच्या वेळी कॉलेज राऊंडच्या प्रवेशित ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना मागील व चालू वर्षापासुन बंद केलेली शिष्यवृत्ती सुरू करण्याबाबत पाठपुरावा करून ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन द्यावा, अशी मागणी आहे.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांना सुध्दा जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समंवयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, बबन राजूरकर, आदी उपस्थित होते.