News34 chandrapur
वरोरा - शहरातील गजानन नगरातील सरदार पटेल वार्डात 6 ऑक्टोम्बरला शिक्षकांच्या घरी भर दुपारी धाडसी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
भर दुपारी तिराणीक यांच्या घरून तब्बल 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. Chandrapur crime news
याबाबत तिराणीक यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली आहे. Daring theft at teacher's house
6 ऑक्टोम्बरला तिराणीक यांच्या दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या, दुपारी 3 वाजतानंतर तिराणीक यांची मुलगी घरी आली असता त्यावेळी घरातील सामान अस्तव्यस्त परिस्थिती मध्ये होते, घरी चोरी झाल्याचे निष्पन्न होताच मुलीने वडिलांना संपर्क साधत फोन केला. Burglarly
अज्ञात चोरांनी तिराणीक यांच्या घरात असलेली स्टील ची आलमारी तोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते यशस्वी झाले नाही. Chandrapur police
घरात लाकडी कपाटात ठेवलेले 25 हजार रोख व मोबाईल असा एकूण 35 हजार रुपयांचा माल चोर घेऊन उडाले.
वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास करीत आहे.
