News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील वाहतूक नियंत्रक शाळेजवळ आज 19 ऑक्टोम्बरला रात्री 10 वाजताच्या सुमारास लाकडाने भरलेल्या अनियंत्रित ट्रक ने मार्गावर असलेल्या 4 ते 5 दुचाकी वाहनाला धडक दिली. Road accident
शहरातुन नागपूर मार्गावर जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH34M5402 ने रस्त्याच्या कडेला पार्किंग मध्ये असलेल्या दुचाकी वाहनांना धडक दिली, यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.
या मार्गावर विना परवानगी ट्रॅव्हल्स उभ्या असतात, त्यामुळे अनेक वाहनांना मार्गक्रमण करीत असताना त्रास होतो, परवानगी नसताना सुद्धा ट्रॅव्हल्स धारक चक्क रस्त्यावर वाहने उभे ठेवतात, त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते, विशेष म्हणजे ट्रॅव्हल्स धारकांचे हे कृत्य वाहतूक नियंत्रक शाखेसमोर होते.
या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
विशेष म्हणजे हा अपघात काही अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ झाला आहे.