News34 chandrapur
नेरी।चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या काजळसर येथे गणपती विसर्जनानंतर ट्रॅक्टरने परत येत असताना गणेशभक्तावर काळाने घाला घातला. गावा शेजारील जंगल नाक्याजवळ ट्रॅक्टरची ट्राली उलटून भीषण अपघात झाला, यात एक महिला जागेवरच ठार झाली तर 6 जन गंभीर जखमी असून 35 जन किरकोळ जखमी झाले.
सर्वांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, यात अनेक शालेय मुलांमुलींचा समावेश आहे. Biggest accident
नवयुवक गणेश मंडळ काजळसर यांनी मोट्या उत्साहात गणेशाची स्थापना करून मोट्या भक्तिभावाने 10 दिवस पूजा अर्चा करून आज दि 24 सप्टेंबर ला गणरायाला निरोप देण्यासाठी ट्रॅक्टर वर गणेश मूर्तीला विराजमान करीत वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढून कच्चेपार येथील नहरामध्ये विसर्जन केले. यानंतर परत येत असताना दुपारी 12 वाजताच्या दरम्यान जंगल नाक्याजवळ अचानक ट्रॅक्टरची ट्राली पलटली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात प्रेमीला गुलाब श्रीरामे वय 45 वर्षे यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर 6 जन गंभीर जखमी तर 35 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. या ट्राली मध्ये अनेक जनाची उपस्थिती होती त्यात काही महिला, शालेय विद्यार्थी व एक वीज पुरवठा करणारे जनरेटर होते. सदर घटना ट्रॅक्टर ला ब्रेक लावल्यामुळे जनरेटर आणि उपस्थितांची एका बाजूला वजन वाढल्याने ट्रॅक्टर पालटला असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर घटनेत जखमींच्या डोक्याला हाताला पायाला मार लागला असून काहींचे हातपाय तुटले आहे तर काहींना छातीला जबर मार लागला आहे. सदर घटनेने काजळसर गावात एकच हाहाकार माजला असून जो तो घटनास्थळ कडे धाव घेत होते. सदर घटनेची माहिती पो पा रामटेके यांनी पोलीस स्टेशन ला देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ रुग्णवाहिका ला पाचारण करण्यात आले दोन रुग्णवाहिका ने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर गंभीर जखमींना उपचारासाठी चंद्रपूर, नागपूर, ब्रम्हपुरी रेफर करण्यात आले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरणीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. सदर ट्रॅक्टत उद्धवजी निकोडे यांच्या मालकीचे असून नरेश नावाचा व्यक्ती गाडी चालवत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.