News 34 chandrapur
घुग्घूस : चंद्रपूर येथील श्याम नगर परिसरात राहणारे सपन संतोष गाईन वय 44 वर्ष हे दिनांक 05 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता आपल्या दुचाकी स्पेलंडर MH 34 - AZ- 1086 वाहनाने सपत्नीक चंद्रपूर वरून धानोरा येत असतांना धानोरा फाटा जवळ त्यांचा टीन थाई अगीन रोडवेज कंपनीच्या टी.एन.37 वाहना सोबत भिडत झाली असता सपन गाईन यांचा जागीच मृत्यू झाला. Accident
तर त्यांची पत्नी मंजू गाईन हे गंभीररीत्या जखमी झाले असता त्यांना शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले मात्र त्यांची परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याने त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात येत आहे. Congress chandrapur
अपघातग्रस्त दाम्पत्याला एक तेरा वर्षाचा मुलगा व दहा वर्षाची मुलगी आहे, आपल्या बहिणीचे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त होत असल्याने मंजु गाईन यांचे मोठे बंधू नंदलाल कमांकर रा. घुग्घुस यांनी काँग्रेस कार्यलयात मदती करिता धाव घेतली असता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी आवारपूर येथिल टीम थाई कंपनीचे अधिकारी बिजू एम. वी याला कार्यालयात आणून कुटूंबा बरोबर बैठक करून अंतिम संस्कारा करिता पन्नास हजार, बहिणीच्या उपचारासाठी दोन लाख त्वरित त्यांच्या खात्यात टाकण्यात आले व मुलांच्या भविष्या करिता विम्याचे पैंशे मिळण्याकरिता ही संपूर्णपणे कागदोपत्री मदत करण्याचे ही लेखी आश्वासन देण्यात आले.
याप्रसंगी अलीम शेख, रोशन दंतलवार,रोहित डाकूर, अमित सारीढोक, रफिक शेख,बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, साहिल सैय्यद,सुनील पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.