News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - समाजातील असमानता नष्ट करुन समतेवर आधारित समाज निर्मिती करीता सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामधूनच आपण मोठे झालो. तेच ऋण फेडणे सर्वांचे कर्तव्य आहे. असे आव्हान ताडोबा प्रकल्पाचे संचालक,वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले. सत्यशोधक सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त ग्रंथालय व वसतिगृह उद्घघाटन सोहळ्या प्रसंगी बोलले. व आयोजकांना शुभेच्छा दिल्यात.
आ.भा.महात्मा फुले समता परिषद, आ.भा.माळी महासंघ,भूमिपुत्र ब्रिगेड,सत्यशोधक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नामदेवराव गावतूरे आवारात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षा चंद्रपूर येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनीही महात्मा फुले यांना अपेक्षित असलेला सत्यशोधक समाज घडविण्यासाठी संघटन मजबूत करायला पाहिजे, शिक्षण महाग झाल्याने शिक्षणासाठी सर्वांनी झटले पाहिजे, देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशा सर्व मुद्यांचा उहापोह आपल्या कणखर अध्यक्षीय भाषणामधून केल्या.
प्रमुख मार्गदर्शक माजी जी.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडोळे, प्रमुख अतिथी पोलिस उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, सत्यशोधक विचारवंत प्रल्हाद कावळे (गुरुजी), बहुजन चळवळीचे नेते प्रा.गुलाब मोरे, आ.भा.समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, प्रख्यात साहित्यिक प्रब्रम्हनंद मडावी, पत्रकार संघ सचिव गंगाधर कुंनघाडकर, हिरालाल भडके, दिनकर मोहूर्ले, डॉ.समीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथालय व वसतिगृहाचे उद्घघाटन केले. Satya shodhak samaj

याप्रसंगी मुख्य अतिथी प्रा. रामभाऊ महाडोरे यांनी समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक बळ मिळावा यासाठी सावित्री व महात्मा फुले यांचे विचारातून संघटन व प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. समाज चळवली निमित्त डॉ.राकेश व डॉ.अभिलाषा दांपत्याने समाजासाठी झटत आहेत. समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा असे विचार व्यक्त करुन आयोजकांचे अभिनंदन केले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रम्ब्रम्हाबंद मडावी ,माजी प्राचार्य नकटू सोनुले, यांनी सत्यशोधक व गुलामी नेमके काय यावर योग्य मार्गदर्शन केले. तर प्रमुख अतिथी उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनी महात्मा आणि माई सावित्री नसती तर शिक्षण मिळाले नसते,आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर कायदा मिळाला नसता. म्हणून स्पर्धा परीक्षा देऊनच मोठे होऊन फुले आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करावे असे मत व्यक्त केले.
सत्यशोधक चळवळीचे अभ्यासू सत्कारमूर्ती प्रल्हाद कावळे यांचा आयोजकांनी सत्कार केला.त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महात्मा फुलेचे विचार समाजात रुजविणे खूप कठीण बाब आहे. केवळ ग्रंथावर विश्वास न ठेवता विचार करत नाही ही उणीव आपल्यातून दूर करावी मूळ कारण शोधावे हाच खरा सत्यधर्म आहे. असे उद्बबोधन करुन आयोजकांनी केलेल्या सत्काराची पावती दिली. तर.प्रा.गुलाब मोरे यांनी वाचनालय, अभ्यासिका हेच खरे मंदिर असल्याचे समजावून सांगितले. श्री.नामदेव गावतुरे सौ.शशिकला गावतुरे यांनी आपल्या आवारात विद्यार्थ्यांनिसाठी ग्रंथालय व अभ्यासिका निर्माण करून दिल्याबद्दल आयोजक सर्व संघटनेतर्फे त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. याप्रसंगी आ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, हिरालाल भडके यांनीही महात्मा फुलेंचे सत्य शोधले पाहिजे असे सविस्तर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.जोगदंड यांनी तर प्रास्ताविक ऍड.सोनुले यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार भूमिपुत्र संघटनेचे प्रमुख तथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ.राकेश गावतूरे यांनी मानून सत्य शोधक चळवळीला व्यापक स्वरूप मिळे पर्यंत सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला समता परिषद,आ.भा.माळी महासंघ, भूमिपुत्र ब्रिगेड, ज्ञानज्योती फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.