News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काची व शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटक नाशक औषधे आणि अत्यावश्यक बियाणे अतिशय अल्प दरात आवश्यक तेवढा पुरवठा करणारी तालुक्यातील एकमेव आदर्श सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादित मुल ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवारला संपन्न झाली.
असून सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे सभापती श्री.पुरुषोत्तम भुरसे होते. तसेच संस्थेचे सन्माननीय संचालक उपसभापती श्री.विनोद गाजेवार, संचालक राकेश रत्नावार ,श्री.घनश्याम येनुरकर, श्री. राजेंद्र कन्नमवार, श्री अशोक पुलावार,श्री .र.झु. मोहूर्ले, श्री.मु.का.भोपये,यांचे शिवाय श्री.संदीप कारमवार, श्री.म.सू. कटकमवार यांचेसह तालुक्यातील असंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीस संस्थेचे सभापती श्री.पुरुषोत्तम भुरसे यांनी संस्थेच्या आज पर्यंतचा प्रगतीचा आढावा सादर करतांना पूर्वीच्या काळात संस्थेची मंदावलेली प्रगती ही संस्था चंद्रपूर जिल्ह्याचे नेते मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय संतोशसिह रावत यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वात आली तेव्हाच सुरवातीला आमच्या संस्थेला सी.डी.डी.सी.बँकेने आवशक तेवढा आर्थिक मदतिचा हात लिमिटद्वारे करुन संस्था पुनर्जीवित करण्यासाठी बळ दिला याबद्दल संस्थेचा सभापती या नात्याने मी समस्त संचालक मंडळाच्या वतीने संतोष भाऊंचे जाहीर आभार मानले.
तसेच संस्थेचे संचालक राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर, राजेंद्र कन्नमवार, यांनीही संस्थेने तालुक्याच्या ठिकाणी जे महत्वपूर्ण मोठे गावं आहेत त्या ठिकाणी कृषी केंद्र,खत विक्री व कीटक नाशक औषधीचे केंद्र स्थापन करुन शेतकऱ्यांना सोईचे होईल अशी सुविधा करावी. असे अमूल्य मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कार्याचा लेखाजोगा व वार्षिक अहवाल वाचन व्यवस्थापक संदीप आलेवार यांनी केले. उपस्थित सर्व संचालकांचे सभासदांचे आभार मानून सभा समाप्त करण्यात आली.