News34 chandrapur
गोंडपीपरी - जगात आजपर्यंत आपण अनेक प्राण्यांचे दुर्लभ व्हिडीओ बघितले असतील मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे एका सापाने चक्क कोंबडीचे अंडे गिळले, सापाने तब्बल 3 अंडे गिळले, मात्र काही वेळातच ते गिळलेले अंडे सापाने ओकत बाहेर फेकले.ग्रामीण भागात गोठ्यात,अंगणात कोंबडीसाठी शिकारा ठेवला जातो. Tare incident
या शिकार्यात कोंबडीचे अंडे असतात.या अंड्यांना कोंबडी उब देत असते.अश्या एका शिकार्यावर नाग सापाची नजर पडली. शिकाऱ्यातील अंडे खायला नाग सापाने शिकारा गाठला. दोन,तीन अंडे नाग सापाने गिळले. egg swallowed by a snake
मात्र शिकार्यात नाग साप बघताच कोंबडी ओरडायला लागली. कोंबडीचे ओरडणे बघून घरमालकाने शिकार्यात डोकावून बघीतले.तेथिल दृश्य बघून त्यांचा अंगावर काटाच उभा झाला.शिकार्यात नाग साप चक्क कोंबडीचे अंडे गिळत होता. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथिल रहीवासी राजू लखमापुरे यांच्या घरी घडला.त्यांनी सर्पमित्र दिपक वांढरे यांना भ्रमणध्वनीने यांची माहीती दिली.वांढरे यांनी डोंगरगाव गाठले.मोठ्या शिताफीने नाग सापाला शिकार्यातून बाहेर काढले.नागाला जेरबंद करीत असतांना नाग सापाने गिळलेले दोन कोंबडीचे अंडे बाहेर ओकले.त्यानंतर सापाला जेरबंद करून सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले.मात्र अंडे ओकतानाचा क्षण कॕमेर्यात कैद झाला आहे.