News 34 chandrapur
चंद्रपुर :- राज्यात झालेल्या अतिवृष्टिमूळे जे सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे तात्काळ पंचनामे करुण नुकसान भरपाई द्यावी तसेच महागाईचा उच्चांक गाठत असतानाही दुर्लक्ष्य करीत असलेल्या या शासनाच्या निषेधार्थ "महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके" अश्या घोषणा देत आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
Inflation peaks
महाराष्ट्र राज्याची परिस्थिती एकंदर खालोखाल जात आहे आणि अशी परिस्थिती असताना फ़क्त सत्ते करीता आमदार खरेदी-विक्रीसाठी प्रचंड पैसा खर्च केलेला आहे.
Horse market of MLAs
एक एक आमदार विकत घेण्यासाठी ५०-५० कोटी रुपये आमदारांना दिले आहेत व त्यांच्या सुख सोयींसाठी सुरत गुवाहाटीमध्ये प्रचंड पैसा खर्च करण्यात आला.
Ncp youth congress
यामुळे "महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके, ५० खोके, जनता भरते जीएसटी गद्दार जातात गुवाहाटी, ५० खोके महागाई ओके, महागाई कशासाठी-आमदारांच्या खरेदीसाठी" अशा घोषणा देत आज महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
50 boxes, inflation OK
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितिन भटारकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रपुर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, राष्टवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेजुल, रायुकॉं जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, तालुकाध्यक्ष राहुल आवळे, पंचायत समिति सदस्य पंकज ढेंगारे, गणेश बावने, शुभम आम्बेदकर, सौरभ घोरपड़े, गणेश यादव, पवन बंदीवार, पियूष चांदेकर, विपिल लभाने, पियूष भोगेकर यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
Farmers affected by excessive rainfall
राज्यात झालेल्या अतिवृष्टि मुळे शेतकर्यांचे जे नुकसान झाले आहे तेथे लक्ष न देता सत्ता पिपासु नेत्यांनी फक्त स्वतःकरीता कॅबिनेट कशी मिळवायची, स्वतःचा पक्ष-पद कशे वाचवायचे याकरीताच संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे.
या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. लवकरात लवकर पावसामुळे झालेले नुकसानिचे पंचनामे करुण नागरिक व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच वाढती महागाई नियंत्रणात आणावी ही मागणी यावेळी करण्यात आली.